Breaking News

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सुफी स्टील पुरस्काराचे वितरण


मुंबई : स्टील उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्टील युजर्स फेडरेशन आफ इंडिया यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी इमर्जिंग स्टील कंपनी ऑफ द इयर चा पुरस्कार कल्याणी स्टील लिमीटेड या कंपनीला मिळाला तर स्टील कंपनी ऑफ द इयर चे मानकरी जे. एस डब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनी ठरली.