Breaking News

साई आश्रमात शॉर्टसर्किटने आग १ लाख १० हजारांचे नुकसान.

राहता प्रतिनिधी)-शिर्डी संस्थानच्या साई आश्रम फेज २ मधील रुममधे वीजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून संस्थानचे १ लाख १० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. संस्थानच्या फायर फायटरने आग आटोक्यात आणल्याने मोठी जीवितहानी टळली.


परवा पहाटे {दि. ३०} साईआश्रम फेज २ मधील बी. ब्लॉकमधील बंद रुममधून धूर बाहेर पडू लागला. सुपरवायझर महेश घोरपडे व स्वच्छता कर्मचारी नितीन पगारे यांच्या निदर्शनास आल्याने तातडीने घटनेची खबर प्रभारी अधीक्षक कैलास घायदार यांना दिली. यावेळी साईसंस्थानच्या फायर फायटरला पाचारण करून बंद असलेला रूमचा दरवाजा तोडण्यात आला.

अग्नीशामक सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. यावेळी निमगाव कोर्हाळे येथील कामगार तलाठी झेंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी या रूममध्ये आंध्रप्रदेश येथील के. वाणी, धनलक्ष्मी, आर. गांधवी, शामलाकुमारी, माधवी, केसरीदेवी, आर रजनी, व्यंकटलक्ष्मी, पी. लक्ष्मी राजेश्वरी, एन. रानी, के. सुनीता, एम. सत्यवती, ए. पावनाकुमारी, लक्ष्मीबाई, डी. पद्मावती आदी १८ जण वास्तव्यास होते. यात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. या आगीत साईसेवकांचे बँगा, कपडे, पुस्तके, मनीपर्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, ओळखपत्रे, 2 बॅग कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.