Breaking News

कोपर्डी : नराधमांच्या फाशी निर्णयाचे जवळकेत स्वागत

जवळके (प्रतिनिधी)-कोपर्डी प्रकरणात तीनही दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे  येथील वेस, जवळके आदी गावांत स्वागत करण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा नुकताच निकाल लागला._कोपर्डीतले अमानुष क्रोर्य करणार्या नराधमांच्या कृत्याचा हिशोब फाशी देऊनही पूर्ण होणार नाहीच. पण न्यायालयाने दिलेला निर्णय हा नक्कीच समाधान देणारा आहे, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.


दरम्यान, फाशीची शिक्षा होऊनही आमची बहिण परत येणार नाही. परंतु न्याय मिळाला. त्याबद्दल आम्ही न्याय व्यवस्थेचे आभारी आहोत, अशी भावना येथील विकास बढे यांनी बोलून दाखविली. कोपर्डीच्या या अमानुष घटनेतील नराधमांना त्यांच्या कृत्याबद्दल फाशी शिक्षा मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच माणिकराव दिघे, आनंदा भडांगे, गणीभाई सय्यद, जालिंदर पोकळे, सतिश जवरे, नवनाथ शेंडगे, देविदास दरेकर, मंगेश भालेराव, विशाल पाचोरे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.