Breaking News

मार्क झूकरबर्गच्या बहिणीचा विनयभंग

सिएटल : फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाल्याची महिती समोर आली आहे.अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. लॉच एंजेलिसवरून मेक्सिकोला जाणाऱया विमानात हा प्रकार घडला. 


हा प्रवासी वारंवार अश्‍लील संभाषण करून रॅन्डी झुकबर्गला त्रास देत होता.इतकेच नाही तर इतर महिला प्रवाशांबद्दल अशलील कमेंट्स करत होता, सोबतच मद्यपानही करत होता. याबाबतची तक्रार रॅन्डीने विमानातील कर्मचार्यांना केली असता त्यांनी रॅन्डीलाच सीट बदलून देण्याची ऑफर दिली. ‘माझ्याच विनयभंग होत असताना मीच का माझी सीट सोडून जायचे, असा विचार माझ्या डोक्या आला,’’असे रॅन्डी म्हणाल्या.