शाळांबाबत आठ दिवसात अहवाल द्या
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या बंद करण्यात येणार्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन करताना येणार्या अडचणींचा आढावा घेवुन शाळेतील अंतर तसेच अडथळ्या बाबतचा अहवाल आठ दिवसात सादर करा असे आदेश वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली.
शासनाने दहा पटसंख्याच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आहे. अनेक ठिकाणी शाळा बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे शासनाने दिलेल्या आदेशानंतर नगर जिल्हयातील 49 शाळेपैकी 22 शाळा बंद केल्या आहेत. उर्वरित 27 शाळांचा अहवाल पुणे येथे झालेल्या बैठकीत देण्यात आलेला आहे.
