रस्ते खड्डे मुक्त करन्याची घोषणा ठरली फसवी.
अनेक प्रमुख रस्त्यासह गाव रस्त्याची दुरवस्था जगजाहीर आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. आजप्रर्यत एकाही लोकप्रतीनिधीने प्रामाणिक प्रयत्न न केल्याने तालुक्यातील धमन्या अशक्तच होत चालल्या आहेत. ही तालुक्याची मोठी शोकांतीका आहे.
कर्जत तालुक्यातील सार्वजनीक बांधकाम विभागाने हाती घेतलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. राज्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पुर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. माञ प्रत्यक्षात काही ठिकाणी कामाला सुरवातच झालेली नाही.
15 डिसेंबर पर्यंत राज्यातील रस्ते खड्डे मुक्त करन्याची सार्वजनीक बांधकाम मंञी यानी केलेली घोषणा फसवी ठरली. तालुक्यातील रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती दि.21डिसेंबर पर्यत पाहावयास मिळत होती. बांधकाम मंञी चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसें 17 पर्यंत रस्ते खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दि.21/12/217 प्रर्यंत रस्त्यांची पहाणी केली असता, बहुतांश प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे दिसून आले.काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले असले तरी त्याचे काम माञ निकूष्ट दर्जाचे झाल्याने बुजविलेले खड्डे महीन्याभरातच उघडे पडत आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा वाहनधारकांना होणारा ञास कायम असल्याची परिस्थिती दिसुन आली
