Breaking News

दांडक्याने व गजाने मारहाण करुन रोकड पळवली

अहमदनगर - जमिनीच्या कारणावरुन झालेल्या कामाचा मनात राग धरुन तिघांनी घरात घुसून कपाटची तोडपोड केली. तसेच त्यातील तीन लाख 70 हजाराची रोकड चोरुन संजय गव्हाणे यास बेदम मारहाण करण्याची घटना नागापुर येथे घडली आहे. 


संजय गव्हाणे (रा.नागापुर) यांचे आणि येथील ज्ञानदेव सप्रे, देवदत्त सप्रे, महेश सप्रे यांच्यांशी जमिनीच्या कारणावरुन वाद झाले. त्या वादाच्या रागातुन सप्रे यांनी संगनमत करुन गव्हाणे यांच्या घरामध्ये घुसून कपाटाची तोडपोड करुन कपाटातील तीन लाख सत्तर हजार रुपये चोरुन नेले. त्यावेळेस संजय गव्हाणे यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गव्हाणे यांच्या पिर्यादीवरुन गुन्हा नोदवीला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोर हे करत आहे.