Breaking News

ट्रिपल तलाकवरील विधेयक आज संसदेत सादर होणार

नवी दिल्ली : देशात ट्रिपल तलाक ही प्रथा संपवण्यासाठी शुक्रवारी संसदेत मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. मोदी सरकार ट्रिपल तलाकला दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याच्या दृष्टीने हे विधेयक सादर करणार आहे. 


या विधेयकात पुन्हा एकदा ट्रिपल तलाक देणा़र्‍या व्यक्तीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद ट्रिपल तलाकवरील विधेयक सादर करणार आहेत. गेल्या आठवड्यात ट्रिपल तलाक विरोधात नव्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला होता व या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.