4 कंटेनरमधील 56 टन गोमांस जप्त
पुणे- मुंबई महमार्गावर गोमांस घेऊन जाणार्या 4 कंटेनरला पोलिसांनी पकडले आहे. या चार कंटेनरमधील 56 टन गोमांस पोलिसांनी जप्त केले असून चारही कंटेनर चालकांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल रात्री उशिरा या कंटेनरवर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पुणे- मुंबई महामार्गावर हैद्राबाद येथून मुंबईच्या दिशेने चार ट्रकद्वारे गोमांस नेले जाणार असल्याची माहिती गोरक्षकांकडून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी परिसरात सापळा रचून हे कंटेनर ताब्यात घेतले.