राजस्थानमधील व्यापार्याची पुण्यात आत्महत्या
पुणे : राजस्थानमधील एका व्यापार्याने पुण्यातील स्वारगेट भागात असलेल्या अवंती लॉजमध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. अशोक परिहार (वय-37) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे राजस्थान येथील असलेले अशोक परिहार हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्यात आले होते. स्वारगेट येथील अवंती लॉजमध्ये ते मुक्कामी थांबले होते. आज सकाळी त्यांनी विष प्राशनकरुन आत्महत्या केल्याचे उघड झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अकस्मित मयत म्हणून नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.