Breaking News

महिला महोत्सव पुन्हा सुरु करा

पुणे, दि. 02, नोव्हेंबर -जागतिक महिला दिना निमित्त महिला महोत्सवाचे आयोजन करण्याचा सर्वपक्षीय नगरसेविकांनी स्थायी समितीला प्रस्ताव दिला आहे. यामध्ये महिला आ णि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले, ज्योती गोसावी, वृषाली चौधरी, माजी महापौर चंचला कोद्रे, वैशाली बनकर, रत्नप्रभा जगताप, अर्चना पाटील तसेच अर्चना मुसळे यांचा समावेश आहे. 


मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.जागतिक महिला दिना निमित्ताने महापालिकेकडून आयोजित क रण्यात येणारा महिला महोत्सव सलग दोन वर्षे वादग्रस्त ठरल्याने महापालिकेकडून तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या वर्षी तो पुन्हा आयोजित करण्यासाठी सुमारे 30 लाख रूपयांची तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय महिला नगरसेवकांनी समितीसमोर ठेवला आहे.