Breaking News

जिल्हयात शेतकरी योजनेसाठी तालुकास्तरीय आढावा बैठकांवर भर

अहमदनगर/प्रतिनिधी। शेतकरी कर्जमाफीचा विषय राज्यात गाजत असताना नगर जिल्हयामध्ये प्रशासनाला चौथी यादी प्राप्त झाल्यानंतर आज प्रशासनाचे व बँकेच्या वतीने जिल्हयाभरात आढावा बैठक सुरु करण्यात आली असुन शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या संदर्भातील माहिती देण्यात येत आहे. तर दुसरीकडे मागील 52 कोटी रुपये अद्यापपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे आता प्रशासनाचा तान वाढच चालला आहे. सुट्टीच्या दिवशीसुध्दा कर्जमाफीचे कामगाच सुरु राहिले आहे.


नगर जिल्हयामध्ये 3 लाख 76 हजार शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले होते. काल येथील प्रशासनाला पात्र शेतकर्‍यांची 50 हजार 162 शेतकर्‍यांची यादी प्राप्त झाली आहे. या यादीत लेखपरीक्षण करुन संबंधीत शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मागील साधारणता 12 हजार शेतकर्‍यांच्या रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करणे बाकी आहे. त्यातच नव्याने चौथी यादी येथील प्रशासनाला प्राप्त झाली आहे. आता नव्याने रक्कम आल्यावर ती संबंधीत शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरवात झाली आहे. 

आज बँकेचेे अधिकारी तसेच स्थानिक पातळीवरचे सचिव यांची एकत्रिपणे बैठक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये कर्जमाफीचे पैसे कशा पध्दतीने जमा करायचे या बद्दलच्या सुचना देण्यात येत आहेत. दुसरीकडे सचिव पातळीवर मागील याद्यांचा घोळ लक्षात घेता अनेकांच्या खात्यावर रक्कम जुळत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच लाभार्थीच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरुन मार्गदर्शन मागवले असले तरीही बँकेचे अधिकारी आता प्रत्यक्ष तालुका स्तरावर जावुन एकत्रित पणे बैठका घेवुन याद्या दुरुस्ती पासून तर येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधुन पैसे कशा पध्दतीने जमा होणार यासह विविध माहिती त्यांना देत आहे.

सुट्टीच्या दिवशीसुध्दा कर्जमाफीसाठी यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. तात्काळ खात्यावर पैसे जमा करा असे निर्देश वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्यामुळे आता प्रशासनाची चांगलीच लगबग सुरु झाली आहे. तालुकास्तरीय कमिटीने याद्या परिपुर्ण करुन देवून बँकेच्या अधिकार्‍यांनीसुध्दा त्या याद्या तपासून घ्यावयाच्या व तात्काळ पैसे कशा पध्दतीने जमा होतील हे पहायचे अशा सुचना देण्यात आल्या आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेचे जाळे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्याशिवाय त्यांना नव्याने कर्ज मिळणार नाही. त्यामुळे आता शेतकरी खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वाट पहात आहे. जिल्हयामध्ये अत्तापर्यंत साधारणता 550 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी देण्यात आलेले आहे. अजुनही अन्य पात्र शेतकर्‍यांची यादी येणे बाकी आहे. मात्र नव्याने यादी आल्यामुळे ती यादी तपासाचे काम प्रशासनाने हाती घेतले असून येत्या चार पाच दिवसामध्ये पैसे कशापध्दतीने वर्ग होतील याची नियोजन करण्याचे काम सुरु झाले आहे. एकंदरीत कर्जमाफीच्या विषयी रेंगळत चालला आहे. प्रशासन चांगलेच मेटाकुटीला आले आहे. अद्यापही 50 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे भरणे बाकी असल्यामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करुनसुध्दा घोळ कायम आहे. माहितीतंत्रज्ञानाचा उपायोग दिसत नाही. अनेक ठिकाणी अजुनही रक्कमेमध्ये व नावामध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत असल्यामुळे प्रशासन व बँकचे अधिकारी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.