Breaking News

स्वच्छता व इतर तक्रारीसाठी मनपाने तयार केले अ‍ॅप नागरीकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी नोंदविता येणार

अहमदनगर/प्रतिनिधी। स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात आहे. स्वच्छता बाबतच्या तक्रारी या सहज पध्दतीने करता याव्यात या करीता महानगरपालिकेने स्वच्छता व इरत तक्रारी करता नव्याने अ‍ॅप तयार केले आहे. त्यामुळे आता नागरीकांना या अ‍ॅपच्या माध्यमातुन तक्रारी नोंदविता येणार आहे. 


स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. विविध सामाजिक संस्थेचा सहभाग सुध्दा यामध्ये घेतला जात आहे. शालेय विद्यार्थीसुध्दा विविध अभियानामध्ये सहभागी होताना दिसत आहे. येथील महानगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता अभियान प्रत्येक प्रभागात राबविण्यास सुरवात केली आहे. अधिकारी व पदाधिकारी यांनी संयुक्तीकपणे मोहिम राबविलेल्या आहेत.

शहरामध्ये कचर्‍याची समस्या व मोकाट जनावरांचा विषय हा सध्या चांगल्याच पध्दतीने गाजत चालला आहे. शहरात 125 टन कचरा तयार होतो. त्यातील अवघा 80 ते 90 टन कचरा उचलला जातो. त्यामुळे कचर्‍याची समस्या सुटण्यापेक्षा दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. घाणीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नागरीकांनी तक्रर करुन सुध्दा काही वेळेला त्याची दखल घेतली जात नाही. अशी उदारहणे सुध्दा पहायला मिळत आहे. जनावारांचा विषयसुध्दा या पध्दतीने गाजत चालला आहे. मोकाट जनावरांचा संदर्भामध्ये तात्पुरत्या स्वरुपाच्या कारवाई होतात. पण कायम स्वरुपी उपाया योजना होत नाही. त्यामुळे नगरकरांना स्वच्छते बरोबरच या सर्व बांबींचा नित्याचा सामना करावा लागत आहे.
महानगरपलिकेने नागरिकांना तात्काळ तक्रारी करता याव्यात याकरीता नवीन अ‍ॅप तयार केले असून गुगलमध्ये गेल्यावर स्वच्छता मोहल्ला असे टाईप करुन ते अ‍ॅप घ्यावे लागणार आहे. त्या नंतर जावुन त्याची भाषा निवडावी लागणार आहे व नंतर मोबाईल नंबर नोंदवावा लागणार आहे. त्या नंतर आपल्याला कशा प्रकारची कंम्पलेंट करायची आहे. याची माहिती तेथे येणार आहे. त्यामध्ये कचरागाडी आलेली नाही. मृत जनावरे उचलण्या बाबत, सार्वजनिक शौचालय स्वच्छ नाही, रस्ते सफाई, सार्वजनिक स्वच्छतागृह विद्यूत जोडणी बाबत अशा प्रकारे या अ‍ॅपच्या माध्यमातुन करता येणार आहे. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी असे स्पष्ट केले असुन नागरीकांनी या अ‍ॅपचा वापर करुन आपला परिसर व स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.
तात्काळ तक्रार करता येणारमहानगरपलिकेने नागरिकांना तात्काळ तक्रारी करता याव्यात याकरीता नवीन अ‍ॅप तयार केले असून गुगलमध्ये गेल्यावर स्वच्छता मोहल्ला असे टाईप करुन ते अ‍ॅप घ्यावे लागणार आहे. त्या नंतर त्याची भाषा निवडावी लागणार आहे तसेच नंतर मोबाईल नंबर नोंदवावा लागणार आहे. त्या नंतर आपल्याला कशा प्रकारची कंम्पलेंट करायची आहे. याची माहिती तेथे उपलब्ध होणार आहे.