शहरातील तीनही महामार्गावर शनिवारी तब्बल तीनतास वाहतुक ठप्प.
अहमदनगर/प्रतिनिधी। गेल्या अनेक दिवसांपासुन वाहतुक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असुन शनिवारी दुपारनंतर तीनही महामार्गावर सुमारे तिन तास वाहतुक ठप्प असल्याने वाहतुक पोलिसांवर याता ताण आला होता तर नागरीकांना त्याचा मनस्ताप चांगलाच सहन करावा लागत होता.
नगर शहरामधून मनमाड, पुणे, औरंगाबाद असे महामार्ग जात आहेत. वारंवार ट्रापीक जाम होण्याचे प्रकार घडत आहेत. सिंग्नल व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरामधुन जाणारे महामार्गाला जोडले गेल्यामुळे सुमारे 22 मार्ग हे महामार्गाला जोडले गेले आहे. त्यातच महत्त्वाची शासकीय कार्यालये शहरात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते.
शनिवारी दुपारी दोन नंतर या तिनही महामार्गावर वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली. 3 कि.मी.मोठ्या रांगा दोन्ही बाजुलने लागलेल्या दिसत होत्या. पोलिस प्रशासन मदतीसाठी गेले असताना अनेक ठिकाणी वाहने वाडवे लावल्यामुळे दुतर्पी रांगा लागलेल्या दिसत होत्या. शहरामध्ये वाहतुकीची कोंंडी मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत होती. अनेक मोठी वाहने ही सर्रापणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे, दिल्लीगेट, स्वस्तीक चौक या मार्गाने नेण्यात आल्यामुळे शहरातील रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी झाली होती.
दोन तासापेक्षा अधिक वेळ वाहतुक ठप्प झाल्यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत होते. शहरात कोणतेही आंदोलन अथवा कोणताही नेत्याचा कार्यक्रम नसल्याने अशा प्रकारचे वाहतुक समस्या भेडावल्यामुळे निश्चित प्रशासनाचे चांगलेच धाबे दनानले आहे. तिन तास वाहतुक एकाच जागी ठप्प झाल्याने, स्टेशनरोड, कोठी पुणे महामार्ग, मनमाड महामार्ग येथे मोठ्या रांगा दिसून आल्या. 4.30 ते 5.00 पर्यंत काही प्रमाणात वाहतुक सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी प्रयत्न सुरु होते. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे सुरु असल्यामुळे वाहतुक ठप्प झालेली होती. तसेच शहरातील वाहतुक महामार्गावर वळल्यामुळे नगरकरांचे चांगलेच हाल झाले.
विविध समस्यांना प्रशासनच जबाबदारबाह्यवळन रस्त्यावरुन वाहतुक का नेली जात नाही. तो दुरुस्त का केला जात नाही. असे प्रश्न उपस्थित झाले आहे. एकंदरीतच शहरातून अवजड वाहतुक बंद करावी असे नियम असताना या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. सध्या वाहतुकीचा बोजबारा उडाल्याचे पहायला मिळत आहे. कायमस्वरुपी यातुन मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असून भविष्यात वाहतुकीची समस्या भेडसावणार नाही. हे पाहणे गरजेचे आहे.