Breaking News

संपादकीय - पराभवाची जाणीव झाल्यानेच...


गुजरात विधानसभा निवडणूका सुरू झाल्यानंतर गुजरात राज्य एकहाती काबीज करू, अशी सुप्त मनिषा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह ही दोन जोडगोळी, बाळगून होती. मात्र अचानक या सुप्त मनिषाला कुठेतरी लगाम, बसल्याचे यानिमित्ताने दिसून आले. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी अचानक गुजरात च्या विधानसभा निवडणूकांमध्ये सक्रिय झत्तल्यामुळे, आणि त्यांच्या भाषणाचा आवेग, जनसामान्यांमध्ये एकरूप होण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाल्यामुळे, भाजपला एकप्रकारे आव्हान निर्माण झाल्यामुळे, या निवडणूकांत भाजपला धक्का बसू शकतो, याची जाणीव व्हायला लागली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या सभांना, होणारी गर्दी कमी होत चालली आहे. त्यामुळे भाजपला एव्हाना आपल्या पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका शिखर परिषदेत बोलतांना म्हणाले की, भ्रष्टाचार निवारण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांमुळेच आम्हाला राजकीय किंमत चुकवावी लागली तरी, आम्ही राजकीय किंमत चुकविण्यास तयार असल्याचे मत प्रदर्शन केले. वास्तविक पंतप्रधानांना या वेळेतच हे मत का प्रदर्शित करावेसे वाटले. 

याचे कारण गुजरात निवडणूकांमध्ये भाजपची ढासळत चाललेली प्रतिमा. तर दुसरीकडे नुकतीच उत्तरप्रदेश 16 महानगरपालिकेंच्या निवडणूका पार पडल्यात. ज्यामध्ये 14 महापालिकांमध्ये, भाजपचे महापौर झाल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, असले तरी, गुजरातमध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे वाढते वजन भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय दलित मंचचा युवा नेता जिग्नेश मेवानी, ओबीसी समाजाचा नेता अल्पेश ठाकुर या त्रियीमुळे भाजपच्या डोकेदुखी वाढली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी गुजरातचा संपूर्ण परिसर सभा, रॅली, याद्वारे पिंजून काढला आहे. तसेच पाटीदार, दलित, मुस्लिम, ओबीसी या मतांवर अवलंबून न राहता, हिंदू मतांची वोट बँक बांधण्यास राहूल गांधी यांनी सुरूवात केली आहे. 

त्यामुळेच अलीकडच्या काळात राहूल गांधी प्रत्येक हिंदू मंदिरात भेट देत आहे. व त्याचे फोटो सातत्याने सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याचाच अर्थ, हिंदू वोटबँक जी भाजपमध्ये होती, ती आपल्याकडे खेचण्यात राहूल गांधी काही प्रमाणात यशस्वी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच गुजरातमधून रोज दिल्लीत निरोप धडकत आहेत, की भाजपच्या वोट बँकेचे धुव्रीकरण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ गुजरात निवडणूकांच्या प्रचारात गुंतले आहे. तरी गुजरातमध्ये विरोधकांना उत्तर देण्यात भाजप यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे विरोधकांचे मुद्दयाकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले जात आहेत. 

नोटाबंदी, जीएसटी, यासरख्या अनेक मुद्दयांचा प्रभाव अद्यापही ओसरला नाही. विशेषत नोटाबंदीमुळे गुजरातच्या व्यापार्‍यांना मोठया प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे नोटाबंदीचा प्रभाव या निवडणूकांवर पडून, तो प्रभाव ईव्हीएम मशीनच्या माध्यमांतून दिसून येतो का? हे काही दिवसांत स्पष्ट होईलच. तर दुसरीकडे पाटीदार समाज आंदोलनाचा युवा नेता हार्दिक पटेल देखील गुजरातमध्ये अनेक सभा घेत, भाजपविरोधात राण उठवत आहे. त्याच्या सभांना वाढता प्रतिसादाला कसा आवार घालावा, यासाठी भाजपकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी अश्‍लील सीडीचे प्रकरण समोर आणल्या गेले, मात्र यामुळे उलट हार्दिकला सहानूभुती मिळाल्यामुळे, भाजपकडून आता हार्दिकला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न शेवटच्या प्रचार टप्प्यात होतांना दिूसन येत आहे. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली आहे.