Breaking News

पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील पायाभूत सोयी- सुविधांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात येत आहेत. रस्ते, सिंचन प्रकल्प तसेच अन्य विकास कामांमुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयी- सुविधा निश्चितच वाढणार आहेत. या विकास कामांसाठी बुलडाणा जिल्ह्याला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधीमंडळाच्या मंत्री परिषद सभागृहात बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, राहूल बोंद्रे, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, विविध विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना आदी उपस्थित होते.