Breaking News

कोर्टाच्या फीवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत पडणार भर

मुंबई : सरकारने न्यायालयीन फीमध्ये वाढ केली आहे. त्याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे राज्याच्या तिजोरीत 20 टक्क्यांनी भर पडणार आहे. पण न्यायालयांवर होणारा खर्च कितीतरी पटीने अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


राज्यातील न्यायाधीशांची संख्या कमी होती. 2015 मध्ये आम्ही न्यायाधीशांची संख्या 20 टक्क्यांनी वाढवली. 2092 न्यायाधीशांपैकी 1972 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. देशात सगळ्यात जास्त न्यायाधीश महाराष्ट्रात आहेत. निकाल लवकर लागावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच तुरुंग आणि न्यायालये डिजिटल माध्यमातून जोडल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही सुनावणी केली जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.