Breaking News

बाजार दबावामुळे किरकोळ घसरणीने बंद

मुंबई : भांडवली बाजारात दबाव आल्याने सुस्तीचे वातावरण होते. निफ्टी दिवसभर 10,450 च्या आसपास होता, तर सेन्सेक्सही मर्यादित प्रमाणात व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दिवसातील तेजीदरम्यान निफ्टी 10,473 पर्यंत पोहोचला होता. संपुआ 2 च्या काळात 2जी स्पेक्ट्रम घोटाळयाप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय दिल्याने यासंबंधित कंपन्यांचे समभाग 20 टक्क्यांपर्यंत वधारले. 


बीएसईचा सेन्सेक्स 21 अंशाने घसरत 33,756 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 4 अंशाच्या किरकोळ घसरणीने 10,440 वर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात जोरदार खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारत बंद झाला. बँकिंग, वाहन, एफएमसीजी, तेल आणि वायू समभागात विक्री झाल्याने दबाव आला होता. बँक निफ्टी 0.15 टक्क्यांनी घसरत 25,554 वर बंद झाला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.7 टक्क्यांनी घसरत बंद झाला. आयटी, मीडिया, धातू, रियल्टी, भांडवली वस्तू आणि ऊर्जा समभागात जोरदार खरेदी झाली.