महाबळेश्वरमध्ये रेव्ह पार्टीवर धाड, नऊ जण ताब्यात
सातारा, दि. 22, डिसेंबर - महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरातील जंगलात सुरू असणा-या रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी तरूण-तरूणींना ताब्यात घेतले आहे. लिंगमळ्याच्या जंगलात बुधवारी रात्री ही पार्टी सुरू होती. बुधवारी रात्री सुरू असलेल्या पार्टीवर वनविभागाने रात्री नऊ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्यांपैकी आठ जणांना आज (गुरुवार) महाबळेश्वर न्यायालयात हजर केले आहे. हे तरुण मिरज, नगर आणि मुंबई येथील उद्योजकांची मुले आहेत. पाचगणीतील एका शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत.
मलिंगमळ्याच्या धबधब्याच्या पार्किंगमध्ये दिव-दमण पासिंगची दोन वाहने तसेच एमएच-16 एफ पासिंगचे एक वाहन उभे आहे. या वाहनातील पर्यटक धबधब्यातून परत आलेले नाहीतफ अशी माहिती आरएफओ रणजित गायकवाड यांनी बुधवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी महाबळेश्वर पोलिसांना कळवली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहिम राबवली. मात्र, हे पर्यटक कुठेही सापडले नाहीत.