महाड-पोलादपूर तालुका शर्यती संघटनेतर्फे बैलगाडी शर्यती सुरू करण्याची मागणी
रायगड, दि. 22, डिसेंबर - महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये शासनाने बैलगाडी शर्यतींना परवागी द्यावी, अशी मागणी महाड-पोलादपूर तालुका शर्यती संघटनेतर्फे करण्यात आली. आज माजी आ. माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाडचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी दोन्ही तालुक्यांतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बैलगाडी शर्यती दरम्यान या बैलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक अत्याचार केला जात नाही, अथवा मारहाणदेखील केली जात नाही. ग्रामीण भागांमध्ये मनोरंजनाची साधने उपलब्ध नसल्यामुळे गेल्या अनेक शतकांपासून बैलगाडी शर्यत हा एक क्रीडा प्रकार म्हणूनच नावारुपास आलेला आहे. त्यामुळे शासनस्तरावर शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी संघटने तर्फे करण्यात आली आहे.