बॅलेट पेपरद्वारे निवडणूका झाल्यास भाजपचा पराभव : मायावती
नवी दिल्ली : उत्तरपालिका महापालिकेंच्या निवडणूक निकालानंतर शनिवारी बहूजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. भाजपने सरकारी मशिनरीचा वापर केला, अन्यथा बसपाचे आणखी महापौर जिंकले असते. जर 2019 मध्ये लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरने घेतल्या तर विश्वासाने सांगते की, भाजपचा पराभव होईल.
दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे आझम खान म्हणाले की, निवडणुकीत काही टेम्परिंग नाही, तर सेटिंग झाली आहे. जेथे ईव्हीएम होती भाजप जिंकला आणि जेथे बॅलेट पेपरने मते टाकली गेली तेथे सपाचा विजय झाला. शुक्रवारी पालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. यूपीच्या 16 नगरपालिकांमधील निवडणुकांत भाजपला 14 आणि दोन जागांवर बसपचा विजय झाला.
याआधी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपचे खातेही उघडले नव्हते, तर विधानसभा निवडणुकीत फक्त 19 जागा मिळाल्या होत्या. विरोधी पक्षांच्या आघाडीवर मायावती म्हणाल्या, बसपला सर्व समाज- दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि उच्चवर्णीयांमध्ये सलोखा हवा आहे. यापेक्षा आणखी कोणती मोठी आघाडी असू शकते!
या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, ’जर भाजप प्रामाणिक आहे आणि लोकशाहीवर विश्वास ठेवते तर, त्यांच्या सरकारने ईव्हीएम मशीन बंद करावेत आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यावे. 2019 ला सार्वत्रीक निवडणुका होत आहेत. जर भाजपला अजूनही विश्वास वाटतो आहे की, लोक त्यांच्या सोबत आहेत. तर, त्यांनी 2019च्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात. मी खात्री देऊन सांगते की, असे झाले तर, उत्तर प्रदेशात भाजप विजयी होऊ शकणार नाही’, असेही मायावती म्हणाल्या.