Breaking News

श्रीगोंद्यात पत्रकारावर हल्ला

श्रीगोंदा / प्रतिनिधी । 23 ः श्रीगोंदा तालुक्यातील दै. सामनाचे प्रतिनिधी सुभाष शिंदे यांना दि. 22 डिसेंबर रोजी चारचाकी मधून आलेल्या अज्ञात पाच ते सहा व्यक्तिंनी रस्त्यात अडून दमबाजी करण्याचा आणि गाडीत उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याने श्रीगोंदा पोलीसात शिंदे यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारानी पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध केला.


पत्रकार सुभाष शिंदे हे दि. 22 रोजी 7. 30 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथून पारगाव सुद्रिक ला जात असताना आयुर्वेदिक कॉलेजजवळ त्यांच्या घराकड़े जाण्याच्या रस्त्यावर मागुन आलेल्या इनोव्हा गाडीतील पाच ते सहा जणांनी पकडण्याचा प्रयत्न करत आमच्या विरोधात बातम्या छापतो का असे म्हणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीचे नुकसान झाले याबाबत श्रीगोंदा पोलीसात शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय काटे, डॉ. बाळासाहेब बळे, बाळासाहेब काकड़े, उत्तम राऊत, अदिंसह पत्रकार उपस्थीत होते.