आगामी काळात सरकार आघाडीचेच - हर्षवर्धन पाटील.
श्रीगोंदा / प्रतिनिधी । 23 - महाराष्ट्र शासनाचा कर्जमाफीतील सावळागोंधळ जनतेसमोर येत आहे. देशातील व राज्यातील भाजप सरकारला जनता कंटाळली असून त्याचा प्रत्यय गुजरात निवडणुकीत आला आहे. 2019 मध्ये होणार्या निवडणुकांत नक्कीच सत्तापरिवर्तन होणार असून पुढील सरकार आघाडीचेच असेल, असा विश्वास मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
काष्टी येथे श्रीराम सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना मा. मंत्री पाटील म्हणाले, राज्यात आघाडी सरकारच्या काळात सहकारी संस्थांच्या स्थापनेला चालना मिळाली. सहकारामुळे महाराष्ट्राला मोठे वैभव प्राप्त झाले. सध्याचे सरकार मात्र सहकाराला बदनाम करून अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. ते म्हणाले, नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांत भाजप काठावर पास झाले.
जनता भाजपला कंटाळली असून गुजरातपासून परिवर्तनाची सुरुवात झाली. येणार्या 2019 चे सरकार काँग्रेस आघाडीचे असेल. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे म्हणाले की, राज्याच्या उभारणीत सहकाराचा पाया, सध्याचे सरकार मात्र सहकारविरोधी धोरणे घेत आहे. साखरेचे भाव प्रचंड उतरले आहेत. परिणामी एफआरपी देणे कठीण बनले आहे. कारखाने तोट्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्यात शेतकरी भरडला जाण्याची भीती आहे. फसव्या घोषणांनी शेतकरी रसातळाला जाईल, अशी भीती नागवडे यांनी व्यक्त केली.
आमदार राहुल जगताप म्हणाले, सहकारी संस्था या ग्रामीण विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत. सहकारी संस्थेच्या माध्यमातून सामान्यांना आपली प्रगती करण्याची संधी प्राप्त होते. नागवडे कारयखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, सध्या ग्रामीण भागातील जनता सरकारच्या आडमुठ्या धोरणांनी त्रस्त आहे. मात्र येत्या काळात नक्कीच सत्तापरिवर्तन घडेल. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, केशव मगर, दिपक नागवडे, जिजाबापू शिंदे, राजू गोरे, प्रेमराज भोयटे, हरिदास शिर्के, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष आदेश नागवडे आदी उपस्थित होते. प्रा. शंकर गवते यांनी सूत्रसंचालन केले.