Breaking News

विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने विदर्भातील सिंचन अनुशेष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून सध्या अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांच्या काळात पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यात येणार आहे. यातून विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वरूड येथे बळीराजा जलसिंचन योजनेचे उद्घाटन आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, रामदास तडस, आमदार डॉ.अनिल बोंडे, रवी राणा, रमेश बुंदिले आदी उपस्थित होते.