Breaking News

शिक्षक परिषदेच्या महाधरणे आंदोलनाला यश

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात सुरु केलेल्या महाधरणे आंदोलनास यश येवून, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुदानास पात्र असलेल्या घोषित शाळांना जुलै महिन्यात पूर्णपणे तर अघोषित विनाअनुदानित शाळांना नियमानुसार अनुदान देण्याची घोषणा केली. या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, शिक्षकांचे इतर प्रश्‍नांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. 


विविध शैक्षणिक मागण्या व शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने दि.13 ते 15 डिसेंबर दरम्यान महाधरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्याध्यक्ष आ. नागो गाणार, मा.आ. भगवानआप्पा साळुंखे, मा.आ.संजीवनीताई रायकर, बाबासाहेब काळे, शिक्षक परिषदेचे राज्य पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री तावडे यांची भेट घेवून, शिक्षकांच्या इतर प्रश्‍नासह अनुदानाच्या प्रश्‍नावर चर्चा केली होती. अनेक वर्षापासून शिक्षक बंधू व भगीणी विनाअनुदान तत्वावर अत्यंत निष्ठेने काम करत होते.

शिक्षक परिषदेच्या प्रयत्नामुळे त्यांना वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे नाशिक विभाग प्रमुख प्रा.सुनिल पंडीत, प्रांत सदस्य भानुदास बेरड, अनिल आचार्य, अरविंद आचार्य, उकीर्डे सर, देवकर सर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष विनायक कचरे, शशिकांत थोरात, तुकाराम चिक्षे, सुरेश विधाते, डी.यु .अहिरे, बबन शिंदे, बांगर सर, सुलभा कुलकर्णी, अनिता सरोदे, विठ्ठल ढगे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, अभय जामगावकर, रात्रशाळा प्रमुख सुनिल सुसरे, चंद्रकांत चौगुले, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा.बाबासाहेब शिंदे, अरूण दळवी, म्हस्के सर आदिंसह शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.