हॉटेल मालक व अधिकार्यांवरही कारवाई करु : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्नितांडव झालेल्या कमला मिल कम्पाऊंड परिसराला शुक्रवारी भेट दिली. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याशिवाय ज्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले, अशा 5 बीएमसी अधिकार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर जाणीवपूर्वक परवाने दिले असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत काही संशयित बांधकामे आहेत, त्याचे ऑडिट करण्याचे आदेश बीएमसीला दिले आहेत. तसेच जे विनापरवाना हॉटेल्स वगैरे चालत असेल, तर ते पाडून टाकले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.