बसस्थानकावर अस्वच्छता आणि असुविधा
अहमदनगर / प्रतिनिधी-शहरातील माळीवाडा बसस्थानकावरील आरोग्यावर घातक परिणाम करणार्या कचर्याचा आणि बसस्थानक परिसरामध्ये होर्डींग लावण्यासाठी तयार केलेले खड्डे बर्याच दिवसांपासुन तसेच खांदलेले, त्यावर कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता उघडेच ठेवण्यात आले होते. या दोन्ही विषयांचा दै. लोकमंथनने पाठपुरावा केला होता, त्यातुनच संबंधित अधिकारी आणि कान्ट्रॅक्टर यांनी बसस्थानकावरील प्रवाशांच्या अडचणी दुर केला, यामध्ये खोदलेल्या खड्डयांची आणि कचर्याची विल्हेवाट संबंधितांकडून लावण्यात आली.
शहरामध्ये आज मितीस तीन बसस्थानक सक्रिय अवस्थेत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये जुना स्टॅण्ड म्हणुओळखले जाते, ते म्हणजे माळीवाडा बसस्थानक, दुसरे म्हणजे तारकपुर बसस्थानक आणि तिसर्या क्रमांकाचे बसस्थानक म्हणजे पुना बसस्थानक किंवा मग ते 3 नं. चे बसस्थानक म्हणून ओळखले जाते. या बसस्थानकांमध्ये प्रवाशांना मिळणार्या सुविधांची वानवा होत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
आज बसस्थानक क्र 3 येथे पिण्याच्या पाण्याची टाकीच तयार नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरामध्ये असणार्या हॉटेल किंवा बसस्थानकावर असणार्या पाणी विक्रेत्यांकडून पाणी विकत घेण्याची गरज पडते. परंतु या ठिकाणी प्रत्येक प्रवाशास पाणी विकत घेणे खिशाला परवडण्यासारखे नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत कठीण होऊन बसला आहे. त्याचबरोबर बसस्थानकाची स्वच्छता करून स्वच्छतागृहाशेजारीच हा सर्व कचरा एकवटला जात असून, त्यास आग लावली जात असल्याचे दिसत आहे. आणि त्याचठिकाणी बर्याच दिवसांपासूनचा कचरा एककटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी बसस्थानकाच्या परिसरामध्ये नो पार्किंगचे फलक लागलेले असतानाच, त्या फलकासमोरच अनधिकृतपणे वाहने उभी केलेली दिसून येत आहेत. यातुनच नियमांची पायमल्ली केली जात असूनही, याठिकाणी असणार्या सुरक्षा रक्षकांकडून या कृत्याकडे कानाडोळा करत असल्याचे पहावयास मिळत आहे. बसस्थानक व्यवस्थापकांशी पाण्याच्या टाकीविषयी चर्चा केली असता, त्यांकडून समजले की, महानगरपालिकेकडून पाण्याचे कनेक्शन देण्यास विलंब केल्याकारणाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबीत असल्याचे समजते.