आनंदवाडी बंदर प्रकल्प निधीच्या प्रतीक्षेत
सिंधुदुर्गनगरी, दि. 08, डिसेंबर - नुकत्याच झालेल्या ओखी वादळाच्या निमित्ताने विविध भागातल्या हजारो मच्छिमारी नौका देवगड बंदरात आश्रयाला आल्या होत्या. त्यानि मित्ताने या बंदराची गरज अधोरेखित झाली. पण अस असल तरी आनंदवाडी प्रकल्प झाल्यास देवगड बंदरावचा ताण कमी होणार आहे. सध्या या प्रकल्पाला गरज आहे ती निधीची. हा प्रकल्प झाल्यास इथल्या माच्छिमाराना देखील याचा फायदा होणार असून त्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी होत आहे.
देवगड बंदर नैसर्गिकरित्या सुरक्षित बंदर असले तरी त्यामध्ये मच्छीमारांसाठी सोयीसुविधा झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ-बोटीवर बर्फ चढवणे, बोटींवरील मासळी बंदरात आणणे, बोटीवरील खलाशांना पाणी उपलब्ध करून देणे यासाठी छोटया होडया वापराव्या लागतात. ही प्रक्रिया फार त्रासदायक आहे. मच्छीमारी बोट जेटीला लागली तर निम्म्या मनुष्यबळात ही कामे पूर्ण होणार आहेत.
सुरुवातीला म्हणजेच 1982 साली आखलेल्या बंदराचे स्वरूप शासनाने मोठे केले आणि त्या आराखड्याला भूमिपुत्रांनी विरोध केला. आनंदवाडी गाव 500 मीटर वगळून हा प्रक ल्प करावा अशी मागणी करण्यात आली. यामध्ये दहा वर्ष निघून गेली. अखेर हा प्रकल्प रद्द करून देवगड शहरासमोरील खाडीमध्ये नव्याने प्रकल्पाची आखणी करण्यात आली. हा प्रकल्प भव्यदिव्य असला तरी आता नव्या आराखडयाला केंद्र सरकारची मंजुरी गरजेची आहे.
मध्यतरीच्या काळात या प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला व प्रकल्पाला मंजुरी दिली. पाठोपाठ राज्य सरकारनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली व टेंडरही काढले. एका बाजूला या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली तर या नंतर तांत्रिक आराखडे मंजूर होण्यास पुढे सात वर्ष उलटली. मात्र, हे काम मार्गी लागल्यावर भूमिपुत्रांच्या विरोधामुळे ते रद्द करावे लागले. परंतु त्यावेळी केलेला हा विरोध योग्य असल्याचे ओखी वादळाने सिद्ध केला असल्याबाबतची प्रतिक्रिया आनंदवाडी मध्ये राहणार्या स्थानिक मच्छिमार संजय बांदेकर यांनी व्यक्त केली.
त्यानंतर साहजिकच पुन्हा आराखडे दिल्ली येथील संस्थेकडून तयार करून घेण्यात आले. या आराखडयानुसार अद्याप नव्या बंदराला मंजुरी मिळणे बाकी आहे. ज्यावेळी मंजुरी मिळाली त्यावेळी या बंदराचा आराखडा 32 कोटींचा होता. आता बंदर करायचे म्हटल्यास शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. याचाच अर्थ बंदराला अद्यापही मुहूर्त मिळत नाही अशीच परिस्थिती आहे.
देवगड-आनंदवाडी बंदर हे कोकण किनारपट्टीवर नैसर्गिकदृष्टया सुरक्षित म्हणून ओळखले जाते. या बंदराचा विकास व्हावा,याकरिता सुमारे 35 वर्षे मच्छीमारांनी सातत्याने लढा दिला आहे. देवगड-आनंदवाडी बंदर प्रकल्प व्हावा, यासाठी देवगडसह मालवण, वेंगुर्ले तालुक्यातील मच्छीमारांनी देवगडवासीयांच्या आंदोलनाला साथ दिली