Breaking News

नवी मुंबई महापालिकेमार्फत प्रभावी जनजागृतीतून 81 टक्के कचरा वर्गीकरण

नवी मुंबई, दि. 08, डिसेंबर - नवी मुंबई महापालिकेमार्फत मागील दोन वर्षांपासून कचरा वर्गीकरणावर प्रभावीपणे जनजागृती केली जात असल्याने सध्या एकूण कचर्या पैकी 81 टक्के कचर्याचे वर्गीकरण होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिली. 

नवी मुंबई शहर महाराष्ट्राच्या व देशाच्या पश्‍चिम विभागात प्रथम क्रमांकावर व देशात आठव्या क्रमांकावर असून हा क्रमांक उंचाविण्यासाठी मनपा सज्ज झाली आहे. मागील वर्षी 436 शहर स्वच्छ सर्व्हेक्षणात देशभरातून सहभागी झाली होती. यावर्षी 4 हजार हून अधिक शहरे सहभागी होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी देशात पहिला क्रमांक मिळविणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून नागरिकांच्या सक्रिय सहभागाने आपण आपले उद्दीष्ट गाठण्याचा ठाम निश्‍चय महापालिकेने केला आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचून स्वच्छते विषयी एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे. 

तसेच स्वच्छता हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून प्रत्येक नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा न क रणे, घरात निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण करणे, लोकसहभागातून स्वच्छतेकडे वाटचाल करत कचरा वर्गाकरणात व संकलनात प्रगती होत आहे. यासाठी विविध प्रकारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत 3 हजाराहून अधिक सोसायट्यांना भेटी देऊन त्यांना ओला व सुका कचरा याविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच तेथे ओला व सुका कचरा कोणता याविषयी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.