Breaking News

सायबर गुन्ह्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण तपासासाठी पुणे पोलिसांना ‘विनरअप’ ट्रॉफी

पुणे, दि. 17, डिसेंबर - पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील 11 गुन्हे उघडकीस आले आणि 18 गुन्हेगार गजाआड केले. तसेच पुणे शहरात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील सहा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या गुन्ह्यांचा चार महिने अविरत तपास करुन गुन्हेगारांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांचा वैशिष्यपूर्ण तपास लावल्या बद्दल पुणे पोलिसांना ‘विनरअप’ ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.‘डाटा सिक्टुरिटी कौंसिल ऑफ इंडिया’ यांच्यावतीने दरवर्षी ‘बेस्ट एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ देण्यात येतो. 


देशभरातील तपास यंत्रणांकडून सायबर गुन्ह्यांबाबत करण्यात येणार्‍या वैशिष्टपूर्ण तपासासाठी ‘इंडिया सायबर कॉप’ हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील तपास यंत्रणांमध्ये अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार समजला जातो. या पुरस्काराचे वितरण झाले. पुणे पोलिस दलात कार्यरत असताना वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी ‘युपीआय अ‍ॅप’च्या माध्यमातून होणारा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला होता. यामध्ये तत्कालीन सर्व अधिकारी, कर्मचारी या गुन्ह्यांच्या तपासाचा छडा लावला होता. 

अखेर हा तपास ‘इंडिया सायबर कॉप’ या पुरस्कारासाठी निवडला गेला. या पुरस्कारासाठी देशभरातून 226 ‘एंट्री’ आल्या होत्या. त्यातील तीन ‘एंट्री’ निवडून त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये के रळ, कलकत्ता आणि पुणे पोलिसांचा समावेश होता. या तीन यंत्रणांच्या तपासातून एकाची निवड होणार होती. त्यानुसार पहिले पारितोषिक केरळ पोलिसांना जाहीर झाले तर पुणे पोलिसांना ‘विनरअप’ ट्रॉफी मिळाली.