Breaking News

समाजाचे वधुवर मेळावे होणे काळाची गरज -रामनाथ गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- संगणकीय व सोशल माध्यमाच्या जगात माणसे जोडले गेली असली तरी, संवाद व भेटीगाठी कमी झाल्या आहेत. याचा परिणाम मुलांचे लग्न जुळवताना होत असून, अपेक्षित लग्न स्थळ मिळविण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी समाजाचे वधुवर मेळावे होणे काळाची गरज बनली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्र आला असून, अनेक विधायक कामे देखील मार्गी लागणार असल्याची भावना रामनाथ गवळी यांनी व्यक्त केली.


अहमदनगर महानगर व जिल्हा तेली समाजाच्या वतीने माऊली सभागृहात राज्यस्तरीय मोफत वधु-वर मेळावा घेण्यात आला. त्याच्या उद्घाटना प्रसंगी रामनाथ गवळी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे मुरलीधर राऊत, काशीनाथ गाडेकर, श्रीप्रसाद पतके, राहुल म्हस्के, दिलीप दारुणकर, गौरव मचाले, शिरीष पन्हाळे, कांतीलाल माकुडे, ज्ञानेश्‍वर दहीतुले, प्रदीप उबाळे, बाबासाहेब वालझाडे, ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर, राजेंद्र चिंचकर, मोहनराव देशमाने, नानासाहेब भोत, योगेश पतके, दत्तात्रय सोनवणे, सतीष गवळी, निलेश दारुणकर, दीनकरराव घोडके, मिलिंद क्षीरसागर, सोमनाथ बनसोडे, संजय पन्हाळे, विजय काळे, प्रकाश सैंदर, श्रीकांत सोनटक्के, सागर लोखंडे, सोमनाथ देवकर, अरविंद दारुणकर, राजेंद्र म्हस्के, दिलीप सांळुके, संतोष म्हेत्रे, बाळकृष्ण दारुणकर आदिसह समाजबांधव मोठ्या सख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी राज्यातून आलेले सुमारे सहा हजार तेली समाजबांधव उपस्थित होते. वधु-वर मेळाव्याचे उत्तम नियोजन केल्याने मोठ्या संख्येने आलेल्यांना याचा लाभ घेता आला. यामध्ये अनेकांचे स्नेहबंध जुळले गेले. प्रास्ताविकात श्रीकांत सोनटक्के यांनी वधु-वर मेळावा घेण्याचे उद्दीष्ट स्पष्ट करुन, सर्व समाज बांधवांना याचा लाभ होण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उध्दव कालापहाड यांनी केले. आभार ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी मानले.