Breaking News

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भंडा-यातील जवान शहीद

मुंबई : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या ४ जणांमध्ये भंडारा जिल्ह्यातील शहीद जवान मेजर प्रफुल आंबादास मोहरकर वय ३२ वर्षे यांनाही वीरमरण आले आहे. मूळचे पवनी तालुक्यातील पवनी शहरात राहणारे प्रफुल यांनी १२ व्या वर्ग नंतर वर्ष इंजिनिरिंग केली. मात्र देशसेवेचा ध्येय असल्याने इंजिनियरिंग सोडून एनडीएमध्ये प्रवेश मिळविला आणि ८ वर्षा अगोदर लेफ्टनंट म्हणून इंडियन आर्मीत भरती झाला. पदोन्नती होऊन आज मेजर पदावर गेले होते. तीन वर्षा अगोदर अवोली मोहंनकर हिच्याशी लग्न झाले. वडील अंबादास मोहरकर सेवा निवृत्त शिक्षक आहेत तर आई शिक्षिका आहेत. लहान भाऊ परेश मोहरकर पुण्यात नोकरी करतो.


त्यांचे प्राथमिक शिक्षण जुनोना गावात झाले तर माध्यमिक शिक्षण आणि त्या नंतरचे संपूर्ण शिक्षण बाहेरच झाले. काल घटनेची माहिती जेव्हा त्यांचा घरच्यांना मिळाली तेव्हा पत्नी माहेरी पुणे येथे होती आणि आई वडील ही पुणे जाण्यासाठी निघाले होते. मात्र माहिती मिळताच पुलगाव वरून परत आले. 

प्रफुल विषयी त्यांच्या आईला विचारले तेव्हा त्यानी सांगितले की तो सुरुवातीपासूनच हुशार होता आणि तो नेहमीच म्हणायचा कि मला देशाची सेवा करायची आहे आणि तिथे जर वीरमरण आले तर त्याचा मला गर्व राहील कारण मरण हे प्रत्येकालाच येत मात्र देशासाठी जर जीव गेला तर अभिमानच राहील तुम्हाला त्यामुळे त्याचे आज त्यासर्व शब्द आठवत आहेत, मला अभिमान आहे. माझा मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा मात्र हे सांगताना एक आई मात्र आपल्या लेकरासाठी हंबरडा फोडत होती, तसंच सैनिकांवर कामाचा ताण खूप वाढला असल्याचे हि प्रफुल सांगत होता त्यामुळे शासनाने या कडे लक्ष येण्याची विनंती त्यांनी केली आणि अजून किती आईची लेकरं, पत्नीचे पती आणि मुलांचे वडील हिस्कावाले जातील कधी या दोन्ही देशात शांतता निर्माण होईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रफुल शहिद झाल्याची बातमी गावात पसरल्याने प्रत्येकजण घरी येत होते. त्याच्या शेजारी मित्रानी सांगितलं की, मनमिळावू वृत्तीचा आणि अभ्यासू होता. तो नेहमी देशाविषयी बोलायचा. आर्मीत असूनही स्पर्धा परीक्षेची ही तयारी सुरु होती. तो आमचा मित्र असल्याचा आम्हाला गर्वच आहे.