थंडीची लाट आणखी तीन दिवस राहणार
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असून थंडीचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शहरांतील किमान तापमानात घट होत आहे. आज, रविवारी पुणे शहरातील किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
हे तापमान सरासरीपेक्षा कमी असून येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. हिमालयाच्या जवळील काही राज्यात बर्फवृष्टी असून शीत लहरी निर्माण झाल्या आहेत. या शीत लहरी कोरड्या हवामानामुळे राज्यात येत आहेत. त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण लहरींची तीव्रता कमी झाली असल्यामुळे हवामानात गारवा आला आहे.
महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे : 10.6, जळगाव : 10.2, कोल्हापूर : 15.9, महाबळेश्वर : 13.3, सातारा : 11.4, रत्नागिरी : 18.4, नांदेड : 12 अकोला 10.4, अमरावती : 12.6