मुंबई, दि. 25, डिसेंंबर - अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावात 11 विचा विद्यार्थी असणारा 17 वर्षांचा दलित युवक नितीन आगे याची भरदिवसा जातीवादातून क्रूररित्या हत्या करण्यात आली . मात्र साक्षीदार फितूर झाल्याने नितीन आगेचे मारेकरी जरी निर्दोष सुटले असले तरी त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय नितीन आगेला न्याय मिळणार नाही . या केस मधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी राज्यशासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. तसेच दिवंगत नितीन आगेच्या कु टुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत नितीन आगेच्या वडिलांना राजू आगेंना दिले. बांद्रा येथील संविधान निवासस्थानी नितीन आगेच्या वडिलांनी राजू आगेनी आठवले यांची भेट घेऊन दिवंगत नितीन आगेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली . राजू आगे यांच्या कुटुंबाला खर्डा गावात धोका आहे . त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे . तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा अशी तसेच आर्थिक स्थिती बिकट असल्याने समाजाने पाठबळ देण्याची आर्त हाक राजू आगे यांनी आठवले यांची भेट घेऊन समाजाला मारली. यावेळी रिपाइं तर्फे दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून अधिक 1लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आठवलेंनी राजू आगेना दिले.
नितीन आगेच्या मारेकर्यांना फाशीच झाली पाहिजे - रामदास आठवले
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:30
Rating: 5