Breaking News

अनिकेत कोथळेच्या पत्नी-मुलीला आधार देणार - पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील

सांगली, दि. 25, डिसेंंबर - अनिकेत कोथळे याच्याबाबत घडलेली घटना निंदनीय आहे. त्याच्या पश्‍चात त्याची पत्नी व मुलीची कोणत्याही स्थितीत फरफट होऊ देणार नाही. अनिकेत कोथळे याच्या पत्नीला लहान बहिण, तर मुलीला स्वतःची मुलगी म्हणून सांभाळ करेन, अशी ग्वाही हिंगोली येथील पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी दिली.

सांगली शहर पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याची तीन वर्षाची मुलगी प्रांजल कोथळे हिचे पालकत्व स्वीकारण्यास सुजाता पाटील आपल्या कुटुं बियासह आल्या होत्या. त्यावेळी कोथळे कुटुंबियाला 25 हजार रूपयांच्या मदतीचा धनादेशही त्यांनी दिला. त्यानंतर त्या बोलत होत्या. अनिकेत कोथळे याच्यासमवेत घडल्या प्रकाराबाबतही सुजाता पाटील यांनी कुटुंबियाकडून माहिती घेतली.
अनिकेत कोथळे याच्याबाबत घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या मृत्यूमुळे कोथळे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. किंबहुना एका विवाहितेचा पती, तर एका क न्येचे पितृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे कोथळे कुटुंबिय रस्त्यावर आले आहे. मात्र या कुटुंबाला कोठेही काहीही कमी पडू नये व पैशाअभावी या कुटुंबाची फरफट होऊ नये अथवा शिक्षणापासून प्रांजल कोथळे वंचित राहू नये, यासाठीच आपण तिचे पालकत्व स्वीकारले आहे.