संगमनेरच्या दुर्ग भटक्यांनी अनुभवली शिवशाहीची सफर
संगमनेर / प्रतिनिधी ।०२ - शिवरायांच्या प्रचंड पराक्रमाची उर्जा विखुरलेले उर्जास्त्रोत म्हणजे महाराष्ट्रातील गड-कोट. या गडकोटांवर जाऊन तेथील मराठयांच्या पराक्रमाची पायधूळ कपाळी लावणे म्हणजे साक्षात शिवशाहीची अनुभूती घेण्यासारखेच आहे.
नाशकातल्या इगतपूरी तालुक्यातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे विस्तारलेली आहे. याच रांगेत वसलेले छोटेखानी आकाराचे गिरीदुर्ग म्हणजे त्रिंगलवाडी, बळवंत आणि कावनई. संगमनेरातील दुर्गभटक्यांनी यातील त्रिंगलवाडी व कावनई या दोन्ही किल्ले एकाच दिवशी सर करीत पौराणिक कालखंडापासून ते आजवरच्या सिंहस्थ कुंभमेळयापर्यंतच्या काळात महत्व प्राप्त असलेल्या या ठिकाणांची सफर अनुभवली.