Breaking News

पद्मावती प्रदर्शनाविरोधात श्री शिवप्रतिष्ठानची निषेध फेरी

सांगली, दि. 03, डिसेंबर - संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या वादग्रस्त चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने आज शनिवारी सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी मोटारसायकल निषेध फेरी काढण्यात आली. संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून या चित्रपटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



सांगली जिल्ह्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, या मागणीचे निवेदन श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांना देण्यात आले.

सांगली शहरातील मारूती चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या निषेध फेरीस सुरूवात करण्यात आली. सांगली महापालिका परिसर, राजवाडा चौक, मुख्य स्थानक रस्ता, सांगली जिल्हा काँग्रेस समिती, राम मंदिर चौक व कर्मवीर भाऊराव पाटील चौकमार्गे विश्रामबाग येथून ही निषेध फेरी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी संजय लीला भन्साळी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने दहन करण्यात आले.