नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी : आठवले.
मयत नितीन आगेचे वडिल राजू आगेंनी यांनी त्याशिवाय नितीन आगेच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. या खटल्यातील फुटीर साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी राज्यशासनाने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. तसेच दिवंगत नितीन आगे च्या वडिलांना राजू आगेंना दिले. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या बांद्रा येथी निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आठवले यांनी सदर आश्वासन दिले.
ते म्हणाले, राजू आगे यांच्या कुटुंबाला खर्डा गावात धोका आहे. त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे. तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्रपरवाना देण्यात यावा. आर्थिक स्थिती बिकट असल्याने समाजाने पाठबळ देण्याची आर्त हाक आगे यांनी आठवले यांची भेट घेऊन दिली. यावेळी रिपाइंतर्फे दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून अधिक १ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन ना. आठवलेंनी राजू आगेना दिले.
दरम्यान, ‘कोपर्डी’च्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या अमानवी गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी रिपाइं आणि सर्व आंबेडकरी समाजाने मागणी केली होती. त्या केसमध्ये कमी पुरावे असूनदेखील त्यातील गुन्हेगारांना फाशीच शिक्षा झाली. त्या निर्णयाचे आंबेडकरी जनतेने स्वागत केले. मात्र त्याच जिह्यात खर्डा गावात नितीन आगेच्या अमानुष हत्येतील आरोपी सबळ पुरावे आणि साक्षीदार असताना निर्दोष सुटतात. एकाच जिल्ह्यातील या दोन्ही केसमधील वेगवेगळे निकाल आल्यामुळे समाजात संदेश चुकीचा जात आहे. त्यामुळे नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. यावेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, हेमंत रणपिसे, नगरसेवक सुरेंद्र थोरात, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
7.