मोहम्मद रफी महान पार्श्वगायक - एम.व्यंकय्या नायडू
स्पंदन आर्ट संस्थेच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या मोहम्मद रफी पुरस्काराचे वितरण उपराष्ट्रपती श्री.नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे.विद्यासागर राव, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, मधुमती ठाकरे तसेच मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय उपस्थित होते.