पत्रकार दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा.
दि.६ जानेवारी हा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस.या दिवशी राज्यभर पत्रकार दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी मी पत्रकार झालो तर, / ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रापुढील आव्हाने,/ पत्रकार क्षेत्रातील थोर विचारवंत व त्यांची कार्य या तीन विषयाची स्पर्धा साठी निवड करण्यात आली आहे. तरी स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहुन स्पर्धत भाग घ्यावा.
निबंध स्पर्धेत प्रथम,व्दितीय,तृतीय,विजेत्यांबरोबर उत्तेजनार्थ बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे.बक्षिस अनुक्रमे ५००,३००,२००,१०० रु.रोख,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,शाल,श्रीफळ,गुलाबपुष्पदेवून करण्यात येणारआहे.तसेच सामाजिक,शैक्षणिक,प्रशासकीय,पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनाही जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विजेते स्पर्धकांचे व पुरस्कारांनी सन्मानित करणारांची नावे दि.४ जानेवारीला जाहीर करण्यात येतील.दि.६ जानेवारीला बक्षीस वितरण,आदर्श पुरस्कार प्रदान व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.तरी निबंध स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी व विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी दि.१ जानेवारी पर्यंत दोन पासपोर्ट फोटोसह निबंध व उल्लेखनिय कामाची माहिती बाळासाहेब मुरलीधर जाधव मु.बक्तरपूर ता.शेवगाव जि.अहमदनगर पिन-४१४५०२ (मो.९९२१७४५२६६)या पत्यावर पाठविण्यात यावी.
उशिरा येणाऱ्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह खुल्या वर्गातील स्पर्धकांनी स्पर्धेत,तर उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी सहभागी व्हावे.असे आवाहन म.रा.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक खोसे,ता.उपाध्यक्ष शंकर मरकड,कार्यकारिणी सदस्य सलीम शेख,ईश्वर वाघमारे,नानासाहेब चेडे,आत्माराम कुंडकर,संजय भालेकर,रविंद्र मडके,इसाकभाई शेख,सोपान जाधव,शिवाजी खरड,अनिल खैरे,रामेश्वर तांबे,लक्ष्मण काशिद, अशोक वाघ,यांनी केले आहे.
