Breaking News

टू जी घोटाळयावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे : सिब्बल

यूपीए सरकारने टू जी आणि इतर घोटाळे केल्याचा आरोप करून भाजपने सत्ता मिळवली पण हे आता सिद्ध झाले आहे की, हा विरोधकांचा खोटारडेपणाचा घोटाळा आहे. पंतप्रधानांनी संसदेत येऊन याप्रकणी खुलासा करावा अशी मागणी कपील सिब्बल यांनी केली आहे. 


न्यायालयाने टू जी घोटाळयाप्रकरणी निकाल दिल्यानंतर द्रमुक व काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून आले. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने टू जी घोटाळयाप्रकरणी तत्कालीन यूपीए सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर खिंडीत पकडले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने हाच मुद्दा प्रचारात घेतला होता. भाजपच्या प्रचारमोहिमेला यश आले व काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला होता. निकालानंतर काँग्रेसने आता भाजपला जाब विचारला असून भाजपचा हा खोटारडेपणाचाच घोटाळा असल्याचा आरोप केला.