Breaking News

‘डीएसके’ अटकेच्या भीतीने पत्नीसह गायब सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आपल्या पत्नीसह गायब झाले आहेत. डीएसकेंचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.


अखेरचा प्रयत्न म्हणून डीएसके सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात. मात्र, सर्वोच्च न्यायालयाला हिवाळी सुट्ट्या सुरु असल्याने डीएसकेंसमोरचा तो मार्गही बंद आहे. कोर्टाने 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर डीएसकेंनी ते मुदतीत जमा केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते.डीएस कुलकर्णींना हायकोर्टाकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पुढील 15 दिवसांत म्हणजेच 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये जमा करण्याची तयारी डीएसकेंनी दाखवली होती. 

मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतरही डीएसकेंनी रक्कम जमा केलेली नाही. शिवाय ते आता पत्नीसह गायबही झाले आहेत. नफ्यातील 25 टक्के रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तसेच विकता येणार्‍या संपत्तींची यादीही न्यायालयाने डीएसकेंना सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.