साई समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार.
शिर्डी/प्रतिनिधी :- साईबाबा संस्थान शिर्डीच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दि.२४ व दि.३१ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
या कालावधीत शिर्डीत लाखो भाविक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. या काळातील होणारी गर्दी लक्षात घेवून संस्थानच्यावतीने श्री साईआश्रम, नवीन भक्तनिवासस्थान (५०० रुम) व साई धर्मशाळा आदी ठिकाणी कापडी मंडपांची उभारणी करुन अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यानन शनिवारी {दि.२३} होत असलेल्या परिषदेचे उदघाटन उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. उपराष्ट्रपती हे सकाळी साईमंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत समाधी मंदिर भाविकांकरीता दर्शनासाठी बंद राहणार असल्याचेही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.