Breaking News

सरपंचांना 20 लाख 3 हजार 525 रूपयांचा दंड

मिरजगाव / प्रतिनिधी । 21 :- येथील वाळुचा बेकायदेशीररित्या साठा जमा केल्याने, सरकारची फसवणूक करून महसुल बुडविल्याप्रकरणी तहसीलदार किरण सांवत यांनी गावचे सरपंच नितीन खेतमाळस यांना 20 लाख 3 हजार 525 रूपयांचा दंड ठोठावला.


कर्जत तालुक्यातील मिरजगांव येथील सरपंच नितीन खेतमाळस यांनी त्याच्या सर्वे नं 553/2 मध्ये 371 ब्रास माती मिश्रीत वाऴुसाठा बेकायदेशीररित्या केला होता, हे केलेल्या चौकशीवरून सिध्द होते, याबाबत तहसीलदार किरण सांवत यांच्या समोरील सुनावणीत निकाल देताना खेतमाळस यांना सुमारे 20 लाख 3 हजार 525 रूपये दंड ठोकवला. 

मिरजगांव येथील कामगार तलाठी यांना सरपंच नितीन खेतमाळस यांनी त्यांच्या सर्वे नबंर 553/2 मध्ये 317 ब्रास मातीमिश्रीत वाळुसाठा केलेला 24 जुन 2017 रोजी दिसुन आला. या नंतर कामगार तलाठ्याची पाच साक्षीदारांच्या उपस्थितीत या वाळुसाठ्याचा पंचनामा केला होता.