Breaking News

बावधन येथे एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न

पुणे, दि. 16, डिसेंबर - कर्नाटक बँकेचे एटीएम मशीन उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे सकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी अनुपम कुलकर्णी (वय 36 रा. बालयांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील कर्नाटक बँकेच्या शाखेच्या शेजारी असणा-या बँकेच्या एटीएम मशीन रुममध्ये अज्ञाताने मशीन उचकटून चोरीचा प्रयत्न केला आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एटीएम रुम व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.