Breaking News

टोईंगबाबतचे मुंबई वाहतूक शाखेचे नियम ठाण्याला लागू करण्याची मनसेची मागणी

मुंबई, दि. 16, डिसेंबर - टोईंग वाहनांबाबत मुंबई वाहतूक विभागाने पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी ठाणे वाहतूक शाखेने देखील करावी, असे विनंती करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वाहतूक शाखेला देण्यात आले.


नो पार्किंगमधील गाडी उचलण्यावरून नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये वारंवार वादविवाद होत असतात. यावर उपाय म्हणून मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने होणारे वादविवाद टाळण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन नागरिक व पोलीस यांच्या हिताचे आदेश पारित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी ठाणे वाहतूक शाखेनेदेखील करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.