मुलाने केली बापाची निर्घृण हत्या.
भिवंडी : भात मळणीच्या कामात मदत करत नसल्याने वडील रागावल्याने संतापलेल्या मुलाने धारदार फरशीने बापाच्या डोक्यात प्रहार करून ठार मारल्याची घटना सोमवारी रात्री ब्राह्मणपाडा (पाये) येथे घडली. धर्मा शंकर धिंडा (७०) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
खळ्यावर भात मळणीचे काम सुरू होते. मुलगा सुरेश हा कामात मदत करत नव्हता. मळणीच्या कामावरून वडिलांनी सुनावून त्यास घराच्या बाहेर हाकलून दिले. यावरून संतापलेल्या सुरेश याने धारदार फरशीने डोक्यात, पाठीवर वार करून वडील धर्मा यांना ठार केले. हत्येच्या घटनेनंतर मुलगा सुरेश हा फरार झाला असून, तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय राजीव पाटील त्याचा कसून शोध घेत आहेत..