Breaking News

अंबरनाथ पंचायत समितीत सेना-राष्ट्रवादीची सत्ता

अंबरनाथ तालुक्यात पंचायत समितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपच्या ताब्यातून सत्ता हिसकावून घेत सर्वच्या सर्व 8 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी झाले आहे. अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत सेना राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवली. 


आठ जागांसाठी शिवसेना-राष्ट्रवादीने युती केली केली. सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीने भाजपला चांगलीच टक्कर दिली. परिणामी भाजपाला पंचायत समितीत शून्य जागा मिळाल्या आहेत. या आधी भाजपची सत्ता होती. सेनेनं 6 जागा तर राष्ट्रवादी 2 जागांवर विजय मिळवलाय. सर्व जागांवर कब्जा करत सेना आणि राष्ट्रवादीने भाजपचा धुव्वा उडवला.