Breaking News

पाटण तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

सातारा, दि. 19, डिसेंबर - पाटण तालुक्यातील डोंगर पठारावरील दुर्गम समजल्या जाणार्या मरड या गावातील गृहस्थ हणमंत दगडू मिसाळ पाटणहून मरड या त्यांच्या गावी जंगलातून पायवाटेने जात असताना भिकाडी या गावाजवळ झुडूपात लपून बसलेल्या तीन रानटी अस्वलांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. 


या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून अस्वलांनी त्यांच्या एका पायाचा लचका तोडला आहे.या हल्ल्याने मिसाळ यांची परिस्थिती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे येथील डोंगरपठारावरील जनतेचे जीवन या रानटी हिंस्त्र पशुंपासून धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.