कत्तलखान्यात राडा, गुन्हा दाखल
अहमदनगर - कामागवरील युनिपॉर्म का घालत नाही. बकरीचे मांस न विचारता खाण्यासाठी का नेता? असे विचारणा केल्याचा राग येवुन कत्तलखान्यातील चार जणांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगांव सिध्दी येथील कत्तलखान्यात घडली आहे.
माहिती अशी की, नगर तालुक्यातील देऊळगांव सिध्दी येथील कत्तलखान्यात काम करणार्या मोबीनखान (रा.देऊळगाव सिध्दी) याने याच्याबरोबर का करणार्या चांदखान नजीन खॉन, मोहंमद असिप, मोहम्मंद शरिप, यांना तुम्ही कत्तलखान्यात काम करताना युनिर्पर्म का घात नाही. अशी विचारणा करुन तुम्ही बकरीचे मांस न विचारता का नेता याचा राग येवुन चौघांनी संगमत करुन मोबीनखान याला धारदार शस्त्रपाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या पायाला मोठी जमख झाली असुन याला मारण्याची धकमी देण्यात आली आहे. या प्रकरणी खान यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलिस हेड कॉस्टेबल व्ही.बी.गांगर्डे हे करीत आहे.
